महायुतीचाच झेंडा जिल्हापरिषद, पंचायत समितींवर फडकणार!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सर्व महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहेत. महायुतीचाच झेंडा सिंधुदुर्ग जिल्हापरिषद व सर्व पंचायत समितींवर फडकणार आहे. खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार. असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

अर्ज भरणा प्रक्रिया 21 तारीख सायंकाळी उशिरा पर्यत सुरु होती. त्यामुळे किती अर्ज भरणा झाले याची माहिती घेतली जाईल. मात्र महायुती मध्ये बंडखोरी होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. असाही ठाम विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

मालवण तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत यांनी मालवण तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, भाऊ चव्हाण, प्रज्ञा चव्हाण, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, संतोष साटविलकर, संतोष कोदे, सुमेधा पाताडे, बंडू चव्हाण, माजी नगरसेवक उमेश नेरुरकर, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, जिल्हा प्रवक्ते राजा गावकर, शेखर गाड, पिंट्या गांवकर, राजन माणगावकर, राजू बिडये, बाबू आंगणे, छोटू ठाकूर, मनोज हडकर, भाऊ हडकर, अखिलेश शिंदे, प्रसाद आडवणकर, मनोज वाटेगांवकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

दत्ता सामंत म्हणाले पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या निवडणुका भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उतरली आहे आणि ही महायुती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेना संपर्क मंत्री उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुका लढविल्या जात आहे. या निवडणुकीत महायुती जिल्हपरिषद व सर्व पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा फडकेल. हा विजय महाराष्ट्रात नवा इतिहास निर्माण करतील. जर एखाद्या वेळेस बंडखोरी झाली तर ती थांबविण्याची ताकद आमच्या महायूतीच्या नेत्यांकडे आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे असे वाटत असते मात्र एकालाच कोणाला तरी उमेदवारी मिळते त्यामुळे पक्षनिष्ठा आणि नेत्यांवर श्रद्धा असणारे लोक या निवडणुकीत पक्षाच्या नेतेमंडळींनी सांगितल्यानंतर जर बंडाखोरी केली असतील तर उमेदवारी अर्ज मागे घेतील.

पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विरोधकांना उमेदवार मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ते उमेदवार शोधत आहेत सिंधुदुर्गात महायुतीची शंभर टक्के ताकद आहे याचे कारण म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते किंवा सरकार प्रत्येक प्रसंगाला, विकासाला धावून जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना यश मिळणार नाही. सर्वच्या सर्व जागा आम्ही महायुती म्हणून जिंकू, असेही दत्ता सामंत म्हणाले.