चिपळूण (वार्ताहर) : मुंबई क्रीडा मंडळ बामणोलीच्या वतीने दिनांक २५ रोजी चॅम्पियन ट्रॉफी पर्व ४ या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे शारदाबाई गोविंद पवार उद्यान मालाड पूर्व येथे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बामणोली गाव वाडी मर्यादित क्रिकेट संघ खेळणार आहेत.
मुंबई क्रीडा मंडळ बामणोलीच्या वतीने दरवर्षी गाव मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या क्रिकेट स्पर्धेत बामणोली गाव आणि वाडी मर्यादित सर्व संघ खेळतात आणि यातूनच विजेते निवडले जातात. विजेता आणि उपविजेता संघ यांना आकर्षक पारितोषिक सुद्धा मंडळाच्या वतीने देण्यात येते. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण यांच्यासाठी सुद्धा वैयक्तिक पारितोषिक मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता होईल तर बक्षीस वितरण सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल. या स्पर्धेसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन मुंबई क्रीडा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.













