मंडणगड | प्रतिनिधी : भारत सरकारचे निवडणुक आयोगाच्यावतीने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा पुनर्रनिरिक्षण कार्यक्रम मंडणगड तालुक्यात सुरु झाला आहे. त्या अनुषंगाने मतदार यादी शुध्दीकरण करण्याच्या दृष्टीने मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बी.एल.वो) घरोघरी भेट देऊन मतदारांच्या तपशिलाची पडताळणी करणार आहेत. मंडणगड तालुक्यात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम निवडणुक आयोगाच्यावतीने राबवण्यात येत आहे. या उपक्रमात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023 या दरम्यानचे कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदान यादी पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये नोंदणी न केलेले पात्र मतदार, 1 जानेवारी 2024 ला पात्र मतदार, संभाव्य मतदार, पुढीलतीन अर्हता दिनांकावर पात्र मतदार, दुबार नोंदी, मयत मतदार, मतदार यादीतील दुरुस्ती यांची दुरुस्ती अधिकाऱ्यांचे मार्फत होणार आहे. घरोघरी अधिकारी या उपक्रमाची सुरुवात झालेली असल्याने याकामी तालुक्यातील सर्व नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्री. तानाजी शेजाळ व नयाब तहसिलदार श्री. समीर सावंत यांनी केले आहे.











