आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी घेतली माघार..

वेंगुर्ले | प्रतिनिधी : आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे अधिकृत उमेदवार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष समिधा नाईक यांना महायुतीचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे.

वेंगुर्ले तालुक्यात आडेली जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनीष दळवी यांच्या सह आप्पा गावडे, , विष्णू खानोलकर, ललित कुमारठाकूर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक व नित्यानंद शेणई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
दरम्यान या ठिकाणी आता समिधा नाईक, उबाठा चे विजय नाईक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात लढत होणार आहे.