सावंतवाडी – बांदा मार्गांवर माजगाव येथे फणसाचे झाड कोसळले, वाहतूक ठप्प

सावंतवाडी | प्रतिनिधी

सावंतवाडी – बांदा मार्गांवर येथे आज रात्री सुमारे १०:३० वाजताच्या सुमारास माजगाव पॅलेस हॉटेल बसस्टॉपजवळ बांदेकर यांच्या दुकानासमोरील भलेमोठे फणसाचे झाड अचानक जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर कोसळले.

या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर झाड आडवे आल्याने वाहनांची मोठी कोंडी झाली. पोलिस व स्थानिकांच्या मदतीने वाहने तातडीने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.