कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपा’चा असेल: जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

राधानगरी: भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शुभारंभ तुरंबे येथे नामदार चंद्रकांत दादा पाटील,खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडला.या प्रचार शुभारंभास विरोधकांना धडकी भरेल अशी कार्यकर्त्यांनी व मतदार बंधू भगिनींनी तुरंबे गणेश नगरिमध्ये अफाट गर्दी केली होती.या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे १५ ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केला.प्रचार शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.निश्चितपणे येथील श्रीगणेशाच्या आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा उस्ताह या निवडणुकीच्या विजयाची नांदी ठरेल.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ४१ जिल्हापरिषद व ७३ पंचायत समितीचे उमेदवार उभे केले आहेत.सर्वात जास्त उमेदवार अभे करणारी आमची भारतीय जनता पार्टी असल्याचे नाथाजी पाटील बोलले.त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार वजयी होतील यात तिळभरही शंका नसून जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असेल असा ठाम विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी नामदार चंद्रकांत दादा पाटील,खासदार धनंजय महाडिक, राज्य सचिव महेश जाधव,भोगावती कारखाना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील (कौलवकर), बाळासाहेब नवणे यांच्यासह कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.