महायुतीच्या उमेदवाराला जाहिर पाठींबा
राजापूर प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट ) रिपब्लिकन पार्टी यांची महायुती झाल्याने पक्ष श्रेष्ठीच्या आदेशानुसार तसेच आ.प्रसाद लाड आ. किरण सामंत यांच्या सूचनेनुसार व ओबीसी सेल चे महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल करंगुटकर, जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस स्वप्नील गोठणकर याच्या विनंतीस मान देऊन पेंडखळे पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रफुल्ल् सुर्वे यांनी मंगळवारी आपला उमेदवार म्हणून माझा अर्ज मागे घेतला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आपण आपल्या सहकाऱ्यांसह मतदार संघातमतदारांचा अभिप्राय घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी मतदार संघातील मतदारांनी मागील निवडणुकीत आमच्याकडून प्रयत्न कमी पडले याची आठवण करून देत यावेळी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली व तुंम्ही निवडणूक लढवा असा आग्रह धरला. माझ्या मतदार संघतील लोकांचा आग्रह व प्रतिसाद पाहून त्यांच्या विनंतीला मान देत मी मतदार संघाच्या विकासासाठी या पंचायत समिती गणातुन अपक्ष उमेदवारी दाखल केला.
यासाठी मला अनेकांचे आशीर्वाद, अनेकांचा पाठिंबा मिळाला. तर काही आपल्याच लोकांनी द्वेषाने टीकाही केली आहे. मात्र पक्षश्रेष्ठींचा आदेश आणि.महायुतीचा धर्म म्हणून मी या निवडणूकीतुन माघार घेत असून या गणातील महायुतीच्या उमेदवाराला माझा पाठिंबा जाहीर करत आहे. जरी या निवडणूकितून मी माघार घेतली असली तरी माझ्या मतदारसंघतील विकासकामे करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असेही सुर्वे यांनी नमुद केले आहे.











