भाजपचे उमेदवार मंगेश जोशी व डॉ. राजेंद्र पवार यांची प्रचारात आघाडी
गुहागर | प्रतिनिधी :
माजी आम.डॉ विनय नातू यांच्या पत्नी डॉ.विनीता नातू यांनी तळवली पंचायत समिती गणात घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधला. तळवली पंचायत समिती गणाचे भाजपचे उमेदवार मंगेश जोशी व शृंगारतळी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ त्या मतदारांची भेट घेत होत्या.
तळवली पंचायत समिती गणातून भाजपकडून तरुणांसाठी आश्वासक व सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले कारूळचे माजी सरपंच व डॉ.विनय नातू यांचे विश्वासू सहकारी मंगेश जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.तर शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून भाजपकडून तालुक्याच्या आरोग्य सेवेत गेले अनेक वर्ष अग्रेसर असलेले व आरोग्य सेवेच्या माध्यमातून प्रशासनाची योग्य जाण आणि जनतेशी नाळ असलेले डॉ. राजेंद्र जोशी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. भाजपने आपले दोन्ही उमेदवार अभ्यासू उच्चशिक्षित व प्रशासनावर पकड असलेले दिल्याने मतदारांचा चांगला पाठिंबा त्यांना मिळत आहे.
तळवली पंचायत समिती गणात डॉ. विनिता नातू यांनी घरोघरी मतदारांशी थेट संवाद साधून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना समजावून सांगितल्या. यावेळी मतदारांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी भाजपचे कार्यकर्ते घरोघरी आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत होते.












