जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
कुडाळ प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा उद्या मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी सायं. ४ वाजता कुडाळ हायस्कूल कुडाळच्या मैदानावर होणार आहे. या जाहीर सभेच्या ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी पाहणी केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या निमित्ताने कुडाळ येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेला मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे उद्योग मंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक उपनेते संजय आंग्रे शिवसेना सचिव संजय मोरे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संजू परब भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत संपर्कप्रमुख राजेश मोरे आदी मान्यवर लोकप्रतिनिधी व उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान कुडाळ हायस्कूल येथे सभेच्या ठिकाणी आमदार निलेश राणे यांनी पाहणी केली यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक संपर्कप्रमुख राजेश मोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर शहर प्रमुख अभी गावडे, नगरसेवक राजीव कुडाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.












