पुढील आठ दिवसांत खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार

लांजा गाव विकास कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य

लांजा | प्रतिनिधी : लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांची देखील मोठी गैरसोय होत असून हे खड्डे तातडीने भरण्यात यावेत अशी मागणी लांजा गाव विकास कमिटीच्या वतीने करण्यात आले असून याबाबतचे निवेदन मंगळवारी २५ जुलै रोजी लांजा तहसीलदार यांना सादर करण्यात आले.

लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन महिनाभरापूर्वी मुंबई महामार्ग पडले पडलेले खड्डे हे भरण्यात आले होते .मात्र पावसाला सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्यात पुन्हा एकदा हे खड्डे जैसे येथे झाले आहेत .महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे करण्यात आलेली महामार्गाची डागडुजी ही निकृष्ट दर्जाची होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यामुळे पादचार्यांच्या अंगावर वाहनांमुळे चिखल उडण्याचे प्रकार घडत आहेत. महामार्गावर खडी पूर्णपणे रस्त्यात पसरली असल्याने दुचाकी सारख्या वाहनाचे अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी संबंधित महामार्ग ठेकेदार कंपनी किंवा शाखा अभियंता यांना बोलावून सदर खड्डे पुढील आठ दिवसात भरावे.
याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास गाव कमिटीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन सादर करताना प्रकाश लांजेकर, सुधाकर शेट्ये, विजय कुरूप ,संतोष लिंगायत, दिलीप मुजावर, मयूर शेडे, प्रमोद कुरूप, लहू कांबळे, रवींद्र कांबळे ,अश्रफ रखांगी, शेखर सावंत, विठोबा लांजेकर ,संतोष बेनकर, विशू जेधे आदी नागरिक उपस्थित होते