खेड : वरवली सणघर दरम्यान रस्त्यावर दरड

खेड | प्रतिनिधी : खेड तालुक्यात मंगळवारी सकाळ पासून पावसाच्या जोरदार सरी वर सरी बरसत राहिल्याने जन जीवन विस्कळीत झाले खेड आंबवली मार्गावर वरवली सणघर नजीक रस्त्यावर दरड आल्याने येथील मार्गावरील वाहतूक तब्बल २ तास ठप्प झाली होती.

खेड तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले याची परिणामी ग्रामीण भागात पावसाचा कहर च सुरू होता या दरम्यान वरवली सणघर मार्गावर दरड कोसळली या बाबत ची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांना मिळताच घटनास्थळी जेसीबी दाखल होऊन २ तासाच्या प्रयत्नाने मार्गावरील ठप्प झालेली बिरमणी, वडगाव नांदिवली मार्गा वरील वाहतुक पुर्व पदावर. आणण्यात यश आले तसेच या मार्गावर ऐनवली ते मोहाने दरम्यान झाडे पडली होती
ती देखील बाजूला करण्यात आली.