दोडामार्ग: सुहास देसाई
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांच्या तोफखाण्याने आज दोडामार्ग तालुका दणाणून जाणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज बुधवार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सासोली, झरेबाबर आणि साटेली भेडशी येथे भव्य जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभांना माजी मंत्री आमदार दिपक केसरकर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजू परब जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तालुक्यातील पहिली सभा सासोली येथे दुपारी ३:०० वा.श्री. गणेश मंगल कार्यालय, सासोली येथे तर दुसरी सभा दुपारी ४:०० वा. श्री. आशीर्वाद मंगल कार्यालय, झरेबाबर या ठिकाणी होणार आहे तिसरी सभा
संध्याकाळी ५:०० वा.श्री. गणराज कलामंच, साटेली भेडशी येथे होणार आहे
या सभांना महायुतीचे सर्व उमेदवार, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख श्री. गणेशप्रसाद गवस आणि भाजपा तालुकाध्यक्ष श्री. दीपक गवस यांनी केले आहे.
> “दोडामार्गच्या विकासासाठी आणि महायुतीच्या विजयाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा!”असे आवाहन करण्यात आले आहे











