माजगावमध्ये आज महायुतीची भव्य प्रचारसभा

ना. नितेश राणे आणि आ. दीपक केसरकर करणार मार्गदर्शन

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत, सचिन बिर्जे व उत्कर्षा गांवकर या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता माजगाव येथील सिद्धीविनायक हॉल (पोपकर, भटवाडी) येथे जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री

ना. नितेश राणे आणि माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी या सभेला उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी उडवून देणार आहेत.

माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातून श्री. विक्रांत विकासभाई सावंत, माजगाव पंचायत समिती गणातून श्री. सचिन बिर्जे आणि चराठा पंचायत समिती मतदार संघातून सौ. उत्कर्षा उमेश गावकर हे निवडणूक लढवत आहेत. या प्रचारसभेच्या माध्यमातून महायुती आपला विकासाचा अजेंडा मांडणार असून, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.