रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील एका कंपनीत कामाला असलेल्या परराज्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
राजू सोरेन (41,मुळ रा.ट्रवारा आयनो सोरेन होरोटोला पटकीजुली वस्म,आसाम) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत कंपनी मालक मोहम्मद हुसेन रफिक मंगा यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, मंगा यांची एमआयडीसी येथे ड्राय फिश ही कंपनी आहे. त्यात आसाम राज्यातील 8 कामगारा कामाला आहेत. सोमवार 2 फेब्रुवारी रोजी त्यातील कामगारा राजू सोरेनच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे त्याला रात्री 8 वा.जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना मंगळवार 3 फेब्रुवारी उपचारांदरम्यान राजू सोरेनचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











