जुवाठी जि. प. गटासह जुवाठी व केळवली पंचायत समिती गणातील शिवसेना उमेदवारांचा वाडीवस्तीवर प्रचार

राजापुर तालुक्यातील जुवाठी जि. प. गट व जुवाठी व केळवली पं. स. गणात मतदारांच्या गाठीभेट घेत प्रचार करताना रमेश सुद, प्रसाद मोहरकर
मतदारांचा मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद 
थेट मतदारांशी संपर्क साधत करतायतं विजयाचे आवाहन
राजापूर (प्रतिनिधी): जुवाठी जिल्हा परिषद गटासह या गटात येणाऱ्या जुवाठी व केळवली या दोन्ही पंचायत समित गणात शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेत थेट मतदारांशी संवाद साधला आहे.  शिवसेनेचे जुवाठी जि. प. गटाचे उमेदवार रमेश सुद व जुवाठी पंचायत समिती उमेदवार प्रसाद मोहरकर व केळवली पंचायत समिती उमोदवार भाग्यश्री लाड यांनी अंतिम टप्प्यात थेट वाडीवस्तीवर जात मदारांच्या गाठीभेटी घेत विजयाचे आवाहन केले आहे.
या भागाच्या सर्वांगिण विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडविसासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही देत भविष्यात आंम्ही जनतेचे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही रमेश सुद, प्रसाद मोहरकर व भाग्यश्री लाड यांनी मतदारांना दिले आहे.
राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालमंत्री ना. उदय सामंत व राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आंम्ही भविष्यातही या भागाच्या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी आणून आंम्ही विकास करू अशी ग्वाहीही  सुद, मोहरकर व लाड यांच्याकडून दिली जात आहे.
जुवाठी जिल्हा परिषद गटातुन रमेश सुद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. २० वर्षांचा सामाजिक, राजकिय कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तर  जुवाठी पंचायत समिती गणातुन प्रसाद मोहरकर हे निवडणूक लढवत आहेत. सामाजिक, सहकार व राजकिय क्षेत्रात एक धडपडणारे युवा नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे.
तर जुवाठी गटातील दुसऱ्या केळवली पंचायत समिती गणातुन भाग्यश्री लाड या शिवसेनेच्या उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्या दुसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पंचायत समितीतील पाच वर्षाच्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
या तिन्ही उमेदवारांकडून मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला जात असून त्याला मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.  जुवाठी गट व गणांमध्ये जुवाठीसह कोंडये तर्फे  सौंदळ,  प्रिंदावण, डोंगर, महाळूंगे, विल्ये, हातिवले, उन्हाळे, पन्हळे तर्फे सौंदळ, शेजवली, वाल्ये, कणेरी, बांदीवडे या गावांचा समावेश असून भविष्यातील विकासासाठी जुवाठी जि. प. गट व जुवाठी व केळवली पं. स. गणातील जनता शिवसेनेच्या आंम्हा तिन्ही उमेदवारांच्या ठामपणे पाठीशी असल्याचे रमेश सुद, प्रसाद मोहरकर व भाग्यश्री लाड यांनी सांगितले.