महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन; दोडामार्गमध्ये केसरकर-राणे यांची संयुक्त जाहीर सभा
दोडामार्ग :सुहास देसाई
साटेली-भेडशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार दीपक केसरकर आणि आम्ही मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. इथल्या शेतकरी, बेरोजगार युवक आणि माता-भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधींची गरज आहे. म्हणूनच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
साटेली-भेडशी येथे आज बुधवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार याचा विजयाचा निर्धार करण्यात आला यामध्ये सौ.
श्वेता सूर्यकांत धरणे: जिल्हा परिषद उमेदवार (साटेली-भेडशी)
सौ.सायली स्वप्नील निंबाळकर: पंचायत समिती उमेदवार (कोनाळ)
श्री संजय सातार्डेकर: पंचायत समिती उमेदवार (साटेली-भेडशी)
आदी रिंगणात आहेत
विरोधकांची अनामत रक्कम जप्त करा!
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. नितेश राणे म्हणाले की, “या मतदारसंघातील निवडणूक कार्यकर्त्यांनी आता स्वतःच्या हातात घेतली आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढी ताकद आहे की, योग्य नियोजन केल्यास विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल. निवडणुकीनंतर या भागाला विकासासाठी भरघोस निधी देण्याची जबाबदारी माझी आणि आमदार केसरकर यांची असेल.”
आमदार दीपक केसरकर यांनीही यावेळी मार्गदर्शन करत, गेल्या काही वर्षात या भागात राबवलेल्या विकासकामांचा आढावा घेतला आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली.
या सभेला भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, गोपाळ गावडे, सुधीर दळवी, कल्पना बुडकुले, आकांक्षा शेटकर यांच्यासह तिलारी परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













