पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांची संयुक्त प्रचार सभा माटणे जि.प. मतदार संघात आज बुधवारी पार पडली.

माटने जिल्हा परिषद साठी महायुतीचे दिपक गवस झरेबांबर पंचायत समिती साठी नेहा गवस माटणे पंचायत समितीच्या उमेदवार पार्वती गवस यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा झाली.

यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे उमेदवार दिपक गवस पंचायत समिती कोलझर बिनविरोध उमेदवार तथा शिवसेना दोडामार्ग प्रमुख गणेशप्रसाद गवस दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, संतोष नानचे, अनिल शेटकर, प्रेमानंद देसाई, आदी उपस्थित होते माटणे जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या या दोन उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. या भागाच्या विकासासाठी एक कोटी रुपये निधी देणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी निवडणूक आपल्या हातात घ्यावी भविष्यात विकास निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी माटणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रचारार्थ व्यक्त केला.