नूतन नगराध्यक्षा सौ. मृणालताई शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उदघाटन
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला उदघाटन सोहळा!
देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष व्यावसायिक प्रदर्शन म्हणून ओळख असलेल्या “आनंदोत्सव” ह्या भव्य प्रदर्शनाचा आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात शुभारंभ झाला. नगराध्यक्षा सौ. मृणालताई शेट्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटनाचा सोहळा पार पडला.
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी; एकाच ठिकाणी आकर्षक वस्तूंची भरपूर व्हरायटी
विविध हस्तकलेच्या वस्तू, हर्बल ब्युटी केअर, होममेड कॉस्मेटिकस, क्रिस्टल्स, हँडीक्राफ्ट, कोकणमेवा, घरगुती लोणची, पापड, मसाले, खाद्यपदार्थ, कपडे, ज्वेलरी, साड्या, ब्लाऊजेस, कुर्तीस, ड्रेसमटेरिअल, गाऊन, पर्सेस, पुजा साहित्य अश्या अनेक गोष्टी ग्राहकांना खरेदीसाठी एकाच छताखाली उपलब्ध.
तसेच बेडशीट्स, कोरियन ज्वेलरी, हेअर ऍक्सेसरिज, चिनी मातीच्या वस्तू, फॅब्रिक ज्वेलरी, फ्रीज मॅग्नेट्स , रेडिमेड रांगोळ्या, बॅग्ज, आयुर्वेदिक प्रोडक्ट, पेंटिंग्स, होम डेकोरेशन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गिफ्ट आर्टिकल्स आणि बरंच काही.
सोबत चमचमीत आणि झणझणीत खाद्यपदार्थांची मेजवानी
उद्योजक-उद्योजिकांचा उत्साहपूर्ण सहभाग!
स्थानिक व्यवसायिकांसोबत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक उद्योजक ह्या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, सावर्डा, लांजा अश्या अनेक विविध भागातील असंख्य उत्पादने एकाच छताखाली खरेदीसाठी उपलब्ध.
नवीन उत्पादने, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक व जागतिक दर्जाचे सामान ह्यांचा संगम येथे पाहायला मिळणार आहे. प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलमध्ये मेहनत, नवकल्पना आणि गुणवत्ता दिसून येते.
खास आकर्षण – १०,०००/- ची ब्रँडेड ट्रॉली बॅग, गिफ्ट व्हाउचर्स आणि इतर अनेक आकर्षक बक्षिसे दररोज जिंकण्याची सुवर्णसंधी;
प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी येथे विविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना गिफ्ट व्हाउचर्स व आकर्षक बक्षिसे मिळणार असून मनोरंजन, खरेदी आणि खाद्यमहोत्सवातून ग्राहकांना आनंद देण्याचा प्रयत्न आनंदोत्सव २०२६ ह्या भव्य प्रदर्शनाचा असणार आहे.
उद्योजकांना नेटवर्किंगची संधी
लघुउद्योग व नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा ह्या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. हे प्रदर्शन खरेदीसह ज्ञान, प्रेरणा व नेटवर्किंगची संधी देणारे ठरणार आहे.
हे प्रदर्शन आजपासून ३ दिवस चालणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा मनसोक्त आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनाचा कालावधी : ०६, ०७ आणि ०८ फेब्रुवारी २०२६
भेट देण्याची वेळ : सकाळी ११ ते रात्रौ ९
ठिकाण : पित्रे कलामंच, शिवाजी चौक – मातृमंदिर रोड, मधली आळी, देवरुख.












