▪️आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचा शुभारंभ.
▪️110 बचतगट सहभागी मसुरे | झुंजार पेडणेकर
भविष्यातील राजकारण महिला बचत गटाचे असणार आहे. याच महिला भविष्यात लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. मोठी अर्थ व्यवस्था महिला बचतगट चालवत आहेत. गेली चौदा वर्ष जिल्ह्यातील महिला बचतगट या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. नाबार्डचे विशेष सहकार्य लाभत आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे केले. आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे झाले .
या शुभारंभ सोहळ्यास बँकेचे संचालक व्हीक्टर डान्टस, संदीप गावडे, जिल्हा प्रबंधक नाबार्ड श्रीम.दिपाली माळी, उप निबंधक बाळ परब, नितीन काळे जिल्हा समन्वयक अधिकारी (मावीम), वैभव पवार व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अमरीश मेस्त्री, उमेश वालावलकर आदि उपस्थित होते.
नाबार्ड आणि जिल्हा बँक हा उपक्रम राबवित आहे. बचतगटाना व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न आहे असे यावेळी
दीपाली माळी म्हणाल्या. जिल्हा बँक अनेक उपक्रम राबवित आहे. बचत गटांचे नीती धैर्य वाढविण्याचे काम जिल्हा बँक करत आहे. तयार मालाला व्यसपीठ देण्याचे काम जिल्हा बँक करत आहे असे यावेळी व्हिक्टर डांटस म्हणाले. यावेळी 110 बचतगट सहभागी झाल्याचे साईओ प्रमोद गावडे यांनी प्रस्ताविकत सांगितले. यावेळी के. बी.वरक, पूर्णांनंद सरमाळकर, अमोल शिंदे, दीपक वारंग, संतोष गावकर, उदय तावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.
सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री दि.०८ फेब्रु.ते दि.१०फेब्रु. २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.











