राजापूर | प्रतिनिधी :
राजापूर तालुक्यातील जनतेला शिवसेना महायुतीला १०० टक्के असे घवघवीत यश दिले आहे. हा विजय समस्त राजापूरातील जनतेचा आहे. या निकालाने आणि विजयाने आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. आता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन ग्रामीण भागाच्या विकासाला आणखी गती देणार आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यात राजापूरच्या विकासाचा वेग वाढलेला पहावयास मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केली आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना आता कामाला लागा आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय द्या अशा सुचना वजा आदेश आ. सामंत यांनी नवनियुक्त विजयी उमेदवारांना दिला आहे.
फोटो आ. किरण सामंत.













