राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे उंबर वाडी येथील भूपेंद्र परशुराम गोवळकर व नरेश परशुराम गोवळकर यांच्या घराला विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घर जाळून खाक झाले. घरातील कौले, कोने, टीव्ही, फॅन, कपडे, भांडी सगळे सामान जळून गेले. शिवाय घराच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे गोवळकर कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे.
देवाचे गोठणे उंबर वाडी येथील गोवळकर यांच्या घरात रविवारी २१ रोजी सकाळी घरातील सर्व मंडळी कामासाठी घरच्या बाहेर पडली. त्यानंतर घरात विजेच्या कनेक्शन फॉल्ट असल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे घराला प्रचंड आग लागली. त्यात संपूर्ण घर जळून गेले. आग लागल्याची घटना समजल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थ मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले. मात्र आगीच्या झळा एवढ्या मोठ्या होत्या की त्यात घरातील सर्व सामान, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जाळून खाक झाल्या. शिवाय घरच्या कौले, कोने, वासे, भिंती देखील कोसळल्या. गावातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा सविस्तर पंचनामा केला.












