राजापूर तालुक्यातील शिवगर्जना मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवतीर्थ मैदान, आजिवली येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा शिवगर्जना मित्र मंडळाला १० वर्षे पूर्ण होत असल्याने हा शिवजयंती उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात येणार असून, त्यानंतर मुलांची शिवचरित्रावर आधारित भाषणे व भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी वारकरी भजन तसेच सामुदायिक हरिपाठ होणार असून, भक्तिमय वातावरणात शिवजयंती सोहळ्याची सांगता होणार आहे.
तरी या शिवजयंतीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी शिवप्रेमी नागरिक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवगर्जना मित्र मंडळ, आजिवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.










