मेढा मौनीनाथ मंदिर मार्गांवरील गटार बांधकामाची बांधकाम सभापतींनी केली पाहाणी 

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा मौनीनाथ मंदिर मार्गांवरील गटार बांधकामाची पाहाणी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी शुक्रवारी केली. शहरात सुरु असलेली विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. कामावर योग्य पद्धतीने लक्ष ठेवून कामे दर्जेदार करून घ्यावीत. अश्या सूचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी बांधकाम प्रशासनास दिल्या आहेत.

 

यावेळी उपनगराध्यक्षा दिपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगांवकर, नगरसेविका मेघा सावंत, बांधकाम विभाग अभियंता राजा केरीपाळे यावेळी उपस्थित होते.

 

शहरात सुरु असलेली कामे नियमानुसार दर्जेदार पद्धतीने करून घेणे ही बांधकाम विभाग प्रशासनाची जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने प्रत्येक कामावर लक्ष ठेवावे. अश्या सुचना बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या.