तर उपाध्यक्षपदी देवीदास आडारकर विजयी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. कृष्णा (प्रकाश)मधुकर आडणेकर तर उपाध्यक्षपदी श्री देवीदास ल. आडारकर विजयी झाले.
संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा आज शनिवारी सिंधुदुर्गनगरी येथील पतसंस्था कार्यालयात सकाळी श्रीकृष्ण मयेकर, अध्यासी अधिकारी, मुख्य लिपिक अधीन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी श्री. कृष्णा (प्रकाश)मधुकर आडणेकर व श्री बाळकृष्ण तु. रणसिंग यांनी अर्ज दाखल केले तर उपाध्यक्ष पदासाठी श्री. देवीदास ल. आडारकर व श्री अमित मो. गंगावणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री कृष्णा म. आडणेकर यांना १० मते तर बाळकृष्ण तू. रणसिंग यांना ४ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाचे निवडणुकीमध्ये श्री. देविदास ल. आडारकर यांना १० मते तर अमित मो. गंगावणे यांना ४ मते मिळाली. अध्यासी अधिकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्षपदी श्री. कृष्णा उर्फ प्रकाश आडणेकर व उपाध्यक्षपदी श्री. देविदास ल.आडारकर यांची निवड झाल्याचे घोषित केले.
सदर सभेला संस्थेचे संचालक श्री. दिनेश खवळे, श्री. वासुदेव वरवडेकर, श्री. राजेश चव्हाण, श्रीमती वर्षा मोहिते, श्रीमती अनघा तळावडेकर, श्री. वंदन गावडे, श्री. चेतन गोसावी, श्री. राजेंद्र शिंगाडे, श्री. विलास चव्हाण, श्री. राजन साळुंखे, संस्थेचे सचिव श्री. निलेश कुडाळकर उपस्थित होते.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड झाल्यानंतर सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कर्मचारी वृंदाच्या वतीने सचिव श्री. निलेश कुडाळकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रकाश आडणेकर व उपाध्यक्ष देविदास आडारकर यांचे संस्थेचे माजी संचालक राजू तावडे, माजी अध्यक्ष श्री.
संजय आठले, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, संतोष सावंत, संतोष मुळीक आडणेकर यांचे कॉलेजचे मित्र ॲड. समीर वंजारी, मुन्ना कोरगावकर, मोहन वाडकर, मिलिंद डोके, गावकर, अजय चिंदरकर, संदीप पाटील, नाथा कदम, डॉ. मिलिंद लोके, न्यायालयीन कर्मचारी श्री. दशरथ गावडे, बाळा पालव, प्रसाद मराठे, राजन ठाकूर, सुरेश चोडणकर, रमेश परिवार, संजय गावडे यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.












