रत्नागिरी पोलीस भरती: दुसऱ्या दिवशी ६९५ उमेदवारांची मैदानी चाचणी; ३३९ उमेदवारांची दांडी ६९ अपात्र

रत्नागिरी ः प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा पोलिस भरतीच्या दुसऱ्या दिवशी एकूण 1103 उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी पोलिस दलाकडून बोलावण्यात आले होते. त्यातील 764 उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी हजर होते. त्यातील 69 उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अपात्र ठरले. त्यामुळे 695 उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली तर तब्बल 339 उमेदवार या भरतीसाठी गैरहजर राहिले.
शिपाई आणि चालक शिपाईच्या 108 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरु आहे. सकाळी 5.30 वा.पासून मिरजोळे एमआयडीसी येथील क्रिडा संकुलात या भ्ारती प्रक्रियेला सुरुवात होते. यावेळी प्रथम मैदानी चाचणी घेण्यात येत असून दूसऱ्या दिवशी एहूण 1103 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी केवळ 764 उमेदवारच भरतीच्या ठिकाणी हजर होते. त्यातील 69 उमेदवार पोलिस भरतीच्या नियमात बसत नसल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले. उर्वरित 695 उमेदवारांची 1600 मिटर धावणे,100 मिटर धावणे आणि गोळा फेक या तिन प्रकारच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या.
भरती प्रक्रियेच्या ठिकाणी अपर पोलिस अधिक्षक बी.बी.महामूनी, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर,लांजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरेश कदम, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितिन ढेरे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी पोलिस भरतीवर लक्ष ठेवून होते.