सावंतवाडी :
आरोंदा ते रेडी मार्गावरील आदर्शनगर येथे भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन गटारात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. नारायण बाबाजी नाईक (वय ४२, रा. आरोंदा आग्राळवाडी) असे मृत चालकाचे नाव असून, कारमधील तर सोबत असलेला रत्नाकर गंगाराम नाईक रा.आरोंदा
हा किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण नाईक हे आपल्या ताब्यातील मारुती ८०० कार घेऊन आरोंदा ते रेडीच्या दिशेने जात होते. आरोंदा आदर्शनगर येथील सरळ रस्त्यावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार डाव्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन जोरात धडकली. यावेळी ते जखमे झाले उपचारासाठी त्यांना रुग्णालयात निरसताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले रत्नाकर गंगाराम नाईक (रा. आरोंदा आग्राळवाडी) हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेची फिर्याद आरोंदा जाधववाडीचे पोलीस पाटील जितेंद्र गंगाराम जाधव (५०) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी मृत चालक नारायण नाईक यांच्यावर अविचाराने व हयगयीने वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस व इतरांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. खंदरकर, आरोंदा दूरक्षेत्राचे ए.एस.आय. आरवारी आणि हवालदार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आरवारी करत आहेत .













