साखरपा: वार्ताहर
देवळे येथील मठाजवळ झाड पडल्याने देवरुख चाफवली एस.टी. देवळेतून मागे गेली. देवळीत रस्त्यावर पाणीच पाणी झालं.

देवळे येथे महावितरण लाईनवर झाड पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. देवळेत रस्त्यावर पाणीच पाणी झाले. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी मंडप पडले तर काही ठिकाणी घरावरील नळे ,छप्पर उडाले.









