चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर नायरा पेट्रोल पंपासमोर दुपारी १४.०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी फिर्यादी स्पेश बाळकृष्ण सावंत (वय ४६, रा. सावर्डे पोलीस लाईन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी कंटेनर चालक प्रांजल अजय दाहिया (वय २३, रा. मध्यप्रदेश) याने आपल्या ताब्यातील कंटेनर (क्र. जीजे ०१ एल.टी. ९०८७) मुंबईकडून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात व बेदरकारपणे चालविला. यावेळी रस्ता ओलांडणारा पादचारी आनंद सुंदर हेम्ब्रम (वय १७ वर्षे), जो मूळचा झारखंड येथील रहिवासी होता, यास कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे आनंद हेम्ब्रम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत सावर्डे पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा (गु.र.नं. १३/२०२६) दाखल करण्यात आला आहे.










