आचरा–अर्जुन बापर्डेकर
स्फूरण चढविणारे पोवाड्याचे स्वर आणि मुलामुलींनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमा दरम्याने मावळ्यांसह शिवाजी महाराजांचे आगमन उत्साह वाढविणारे होते. कमलाकांत आचरेकर आणि सहका-यांनी हि व्यक्ती रेखा साकारली होती. यावेळी 111व्या वर्षात पदार्पण करणा-या धी आचरा पीपल्स असोसिएशन संस्थेचा वर्धापन दिन ही साजरा केला गेला. या कार्यक्रमास शाळा समिती अध्यक्ष जे एम फर्नांडिस, समिती सदस्य बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, मुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,उप मुख्याध्यापिका मधुरा माणगांवकर,आचरा मॅनेजमेंट
कॉलेजचे प्राचार्य नितेश सारंग, इंग्लिश मेडीअम स्कूल च्या मायलीन फर्नांडिस यांसह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.











