‘दशावतार’ चित्रपटातील उत्कृष्ट तालरक्षक शुभम पोपकर यांचा सावंतवाडीत सत्कार

 

सावंतवाडी | श्रीरंग सावंत : दशावतार या चित्रपटाने सध्या संपूर्ण जगभरात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. पारंपरिक कलावैभव आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम असलेल्या या चित्रपटातील संगीत विशेष गाजत आहे. या संगीतामध्ये मामा मोचेमाडकर कंपनीमधून संगीतसाथ करत शुभम पोपकर यांनी उत्कृष्ट तालरक्षक म्हणून आपली छाप पाडली आहे. सावंतवाडी येथे आयोजित नाट्यप्रयोगादरम्यान शुभम पोपकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवर, कलाकार आणि रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने हा गौरव सोहळा पार पडला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

शुभम पोपकर यांच्यासारखे कलाकार पारंपरिक कलेचा वारसा अधिक जोमाने पुढे नेत आहेत, अशी भावना व्यक्त करण्यात आली.