छप्पर कोसळलेल्या उभादांडा केंद्र शाळेची जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केली पाहणी

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी अधिकाऱ्यांसमवेत छप्पर कोसळलेल्या उभादांडा केंद्र शाळा नंबर १ या शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पडझड होत असलेल्या या जुन्या इमारतीची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगून जिल्हास्तरावर या कामाला निधी किती लागेल याबाबत चर्चा करून पुढील कारवाई करू असे शाळा व्यवस्थापन समिती यांना सांगितले.

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, वेंगुर्ला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन नरसुले, अण्णा रेडकर, उपाध्यक्ष सावंत मॅडम, सर्व सदस्य शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मुख्याध्यापक गणेश चव्हाण, माता पालक संघ उपाध्यक्ष नवार मॅडम, व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री गणेश चेंदवनकर,परुळेकर साळगावकर मॅडम पोलिस पाटील पार्सेकर मॅडम व इतर सर्व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते