किल्ले सिंधुदुर्गसह चार ऐतिहासिक किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणात स्वतंत्र अध्यासन केंद्र
५० लाख निधी मंजूर : आमदार निलेश राणे यांनी महायुती सरकारचे मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : किल्ले सिंधुदुर्गसह मालवणातील चार ऐतिहासिक किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणात मुंबई विद्यापीठाचे स्वतंत्र अध्यासन केंद्र मंजुरी सोबत ५० लाख निधी ही मंजूर झाला आहे. शिवकालीन इतिहास व सागरी वारशाच्या संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे व महायुती सरकारचे आमदार निलेश राणे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले पद्मदुर्ग, किल्ले राजकोट, किल्ले सर्जेकोट या ऐतिहासिक किल्ल्याच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठ अंतर्गत मालवण येथे स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरु करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे या अध्यसन केंद्र साठी 50 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. व्यापाराचे बेट आणि सागरी व्यापाराचे दुर्मिळ पुरावे संकलित केले जाणार आहेत. युवकांना अभ्यास करण्यासाठी प्राथमिक सुविधा आणि आर्थिक पाठबळ मिळणार आहे. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.












