विजयदुर्ग रामेश्वर वाफेल समुद्रकिनारी स्फोटांचे आवाज

विजयदुर्ग( प्रतिनिधी) रात्री साडेनऊच्या सुमारास रामेश्वर गावातील काही मच्छीमार पारंपारिक गरकडी मच्छीमारी करण्यासाठी गेले असताना त्यांना वाफेल समुद्रामध्ये सुरुवातीला तीन चार आवाज स्पोटांचे आले. त्यानंतर फार मोठा आवाज आला. त्यामुळे मच्छीमार घाबरून लगेचच मच्छीमारी सोडून आपल्या घरी गेले. या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला बातमी दिली. हे नक्की आवाज कसले होते…. काय झालं यासंदर्भात उशिरापर्यंत काहीही निश्चित झालेले नाही. शेवटचा स्फोट हा मोठा झाला असं स्थानिक मच्छीमानांनी सांगितलं यासंदर्भात बातमी समजल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.