लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी विलास गोरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीत रविवारी पार पडली. या बैठकीत संघटना पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
विलास पांडुरंग गोरे यांची महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तर कोकण विभागीय अध्यक्षपदी आनंद त्रिपाठी यांची तर कोकण विभागीय सचिवपदी मनोज रेडिज यांची निवड करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी अशोक जायभाय यांची निवड करण्यात आली.
संघटना राज्य अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे राज्य सचिव राजेंद्र आंधळे राज्य उपाध्यक्ष संतोष सरवदे यांनी रविवारी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर केल्या तशी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहेत.
Home महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी विलास गोरे यांची फेरनिवड











