देवगड : प्रतिनिधी
आंबा फवारणीचे औषध प्राशन केल्याने अत्यावस्थ असलेल्या प्रविण रमेश बांवकर(३३) रा.दहिबांव बांवकरवाडी याचे २५ फेब्रुवारी सकाळी ९.३० वा.सुमारास जामसंडे येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रविण बांवकर याची मानसिक स्थिती बिघडलेली होती.दोन महिन्यांपासून त्याच्यावर मुंबई येथिल मानसोपचार तज्ञांमार्फत उपचार सुरू होते.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा.सुमारास मानसिक स्थिती बिघडल्याने त्याने राहत्या घरातील आंबा फवारणी औषधांमधील फवारणीचे औषध प्राशन केले.ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्याला तात्काळ देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले.मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी जामसंडे येथिल खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी ९.३० वा.सुमारास त्याचे निधन झाले. .मयत प्रविण बांवकर हा अविवाहित होता.
घटनेची खबर निखील रमेश बांवकर (३०) रा.दहिबांव याने देवगड पोलिस स्थानकात दिली आहे.घटनेचा तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.










