रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील मिरकरवाडा येथे दरवाज्ाा बनवण्यासाठी प्लायवूड ग्राईंडरने कट करत असताना ग्राईंडर चूकून पायावर गेल्याने गंभिर जखमी झालेल्या तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. ही घटना बुधवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली.
शरीफउल अनादअली इस्लाम (28,रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे गंभिर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी दुपारी घरात कोणीही नसताना शरीफउल इस्लाम हा घरातील दरवाजा बनवण्यासाठी ग्राईंडरने दरवाज्ाा कट करत होता. त्यावेळी अचानकपणे तो ग्राईंडर हा त्याच्या डाव्या पायाच्या पंजावर गेल्यामुळे तो गंभिर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.












