खेड(प्रतिनिधी) वीज बिल भरले आहे मात्र ते अपडेट झालेले नाही या साठी एटीएम चे डिटेल द्या असे सांगून खात्यावर तब्बल ३ लाख रुपयांची ऑन लाइन फसवणूक केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार १३ जून रोजी वेरळ येथील पूनम अपार्टमेंट मध्ये घडला होता
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
अज्ञात इसमाने एका व्यक्ती च्या मोबाईल नंबर वरुन संपर्क करुन मी इलेक्ट्रीसिटी कार्यालयातुन
बोलत आहे असे भासवुन इलेक्ट्रीसिटी बिल अपडेच न झाल्यामुळे तुमचा इलेक्ट्रीसिटी खंडीत होणेबाबत व त्याबाबत इलेक्ट्रीसिटी ऑफिसर यांचा मोबाईल नंबर हा टेक्स मेसेज द्वारे पाठविला असता त्या क्रमांकावर त्या व्यक्तीने संपर्क करुन त्या अज्ञात व्यक्तीने तो
बँक कर्मचारी आहे असे भासवुन त्यांनी इलेक्ट्रीसिटी बिल भरलेले नसल्याचे सांगुन त्या दरम्यान यांचे एस.बी.आय ,पेंशन अकाउंट खाते आय.एफ.एस.सी कोड यावरुन शेवट असलेल्या ऑक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डवर फिर्यादी यांच्या खात्यातुन ९९,९९९
रुपये व फिर्यादी यांचे एस.बी.आय बचत खाते वरुन
आय.एफ.एस.सी कोड यावरून अॅक्सीस बँकेच्या क्रेडीट कार्डवर खातेतून १,९९,९९७ असे एकुण २ लाख ९९ हजार ९९६ असे ट्रान्सफर करुन घेवुन
फसवणुक केली .









