सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात स्वच्छता अभियान!

मसुरे | झुंजार पेडणेकर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुकळवाड उपकेंद्र व ग्रामसंघ परिसरात साफसफाई करण्यात आली. यावेळी प्रभारी सरपंच श्री.किशोर पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रमिला पाताडे ,माजी पंचायत समिती सभापती श्री.अजिंक्य पाताडे, माजी पंचायत समिती सभापती श्री.प्रसाद मोरजकर, समिती सदस्य श्री.प्रकाश पावसकर, समिती सदस्य श्री.उमेश पाताडे,पोलिस पाटील श्री.लक्ष्मण काळसेकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.अक्षय पाताडे, आरोग्य सेवक श्रीम.लोबो मॅडम, आशा सेविका सौ.अंकिता पाताडे, सौ.रिया पाताडे, आरोग्य मदतनीस सौ.राजश्री पेडणेकर, ग्रामसंघ बचतगट अध्यक्ष सौ.वैदेही मसुरकर, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी श्री.सुभाष म्हसकर व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.