गौरव पोंक्षे | माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श शाळा माखजन मराठी येथे विद्यार्थ्यांना व्यापाराची सवय व्हावी,ओळख व्हावी यासाठी प्रशालेच्या पटांगणात बाल बाजर भरवण्यात आला होता.
विद्यार्थ्यांना बाल बाजार भरवण्यामागचा उद्देश समजावून सांगितल्यावर विद्यार्थ्यांनी पालेभाजा, कापडी पिशव्या,पर्स,पेन,उदबत्या,खाद्य पदार्थ,विविध फळे असे विक्रीला आणले होते.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी थाटलेली दुकाने पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थ आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त खरेदी केली. विद्यार्थ्यांना देखील अर्थार्जनाचा आनंद लुटता आला.
या प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. नांदिवडेकर, श्री रविंद्र घाणेकर, श्री. मितेश पळे, सौ . सुप्रिया जाधव, पालक वर्ग,ग्रामस्थ, व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा सौ शामल सागवेकर. उपाध्यक्ष श्री बाबू धामणाक आदी उपस्थित होते.शाळेच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











