रत्नागिरी ः
तालुक्यातील पाली येथील इंफ्रा कंपनीच्या प्लान्टमधील स्टोअर्समधून 50 लिटर डिझेल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तेथीलच तिन कामगारांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 1 मार्च रोजी पहाटे 4.30 वा.सुमारास घडली.
हर्षितकुमार श्रीराम पांड्ये,कलम दिलीप उपाध्याय,अब्दुल बुध्दू हुसेन रेहमान (सर्व रा.पाली,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयित कामगारांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात प्लान्टचे इंचार्ज राजेशकुमार देवीदयाळ यादव (मुळ रा.फत्तेपूर सध्या रा.पाली,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित तिन्ही कामगार हे इंफ्रा कंपनीच्या प्लान्टमधील स्ओअर्समध्ये कामाला आहेत. त्यांनी रविवारी पहाटे 4.30 वा.सुमारास स्टोअर्समधील 50 लिटर डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.













