तालुका श्रीचा मान आदित्य शिवलकर तर जिल्हा श्रीचा सुरेश भाताडे याने पटकावला
राजापूर (वार्ताहर): शिवबा प्रतिष्ठान राजापूर यांचे वतीने राजापूर श्री २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेचे जवाहर चौक राजापूर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद लाभला.
या प्रतिष्ठानच्या मार्फत आणि बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने सलग पाच वर्षे ही स्पर्धा भरवण्यात येत आहे.स्पर्धेची सुरुवात श्री देव चव्हाटा मंदिर येथे पुष्पहार आणि श्रीफळ अर्पण करून तसेच छत्रपती शिवरायांना पुष्पहार आणि मानवंदना करून फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये सुरू करण्यात आली.
ही स्पर्धा तीन प्रकारात खेळवण्यात आली. पहिल्या फेरी त तालुका मर्यादित त्यानंतर लहान मुलांसाठी लिटिल चॅम्प्स आणि त्यानंतर जिल्हा मर्यादित अशी ही स्पर्धा खेळण्यात आली.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुलांसाठी लिटिल चॅम्प्स ही स्पर्धा. या स्पर्धेत 15 लहान मुलांनी सहभाग घेतला तसेच या लहान मुलांना श्री हर्षद मांडवकर सर यांनी ट्रेनिंग दिले.
तालुका मर्यादित खेळवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आदित्य अविनाश शिवलकर नगरपरिषद जिम राजापूर यांनी तालुका किताब पटकावला. तसेच अभिनंदन सुधीर सातोपे आर एस पी एम दुसरा क्रमांक, फैजान रमीज मुल्ला तिसरा क्रमांक, दीपक वासुदेव पाटणकर चौथा क्रमांक, विशाल रमेश गोंडाळ पाचवा क्रमांक हे स्पर्धक विजयी झाले.
त्यानंतर लिटिल चॅम्प्स ही स्पर्धा खेळण्यात आली यामध्ये जवळपास पंधरा लहान मुलांनी भाग घेतला होता. त्यामधून द्रोण संदीप चव्हाण प्रथम क्रमांक तसेच अर्णव विजय गोंडाळ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. लहान मुलांची बॉडी बिल्डिंग स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात फक्त शिवबा प्रतिष्ठान राजापूर यांच्या माध्यमातून फक्त राजापूर मध्येच खेळवली जाते. त्याबद्दल प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात आले.
तिसरी स्पर्धा ही जिल्हा मर्यादित पाच वजनी गटात खेळवण्यात आली पहिला वजनी गट 55 ते 60 किलो, दुसरा 60 ते 65, तिसरा 65 ते 70 आणि चौथा 75 किलो वजनी गटात घेण्यात आली. त्यामध्ये सुरेश सत्यवान भाताडे फिनिक्स जिम रत्नागिरी यांनी जिल्हाचा किताब पटकावला. तसेच विनीत बेडेकर आरएसपीएम जिम राजापूर याने उगवता तारा आणि नैतिक सुदेश चव्हाण आरएसपीएम राजापूर याने बेस्ट पोझर हे किताब पटकावले. विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेला भाजपा तालुका अध्यक्ष पश्चिम श्री मोहन घुमे, पंचायत समिती सदस्य अभिजीत गुरव, नगरसेवक एड. जमीर खलीपे, नगरसेवक सौरभ पेणकर, नगरसेवक दिलीप चव्हाण, व्यापारी संघटना राजापूर तालुका अध्यक्ष संदीप मालपेकर, आनंद बाकाळकर, रुपेश कांबळे, अभिजीत तेली, आदिल चौगुले, मंदार पेणकर, डॉ. सुयोग परांजपे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मालपेकर यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवबा प्रतिष्ठान राजापूर च्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.













