दोडामार्ग: सुहास देसाई
निसर्गसंपन्न तिराळी खोऱ्यात यंदा क्रिकेटचा नवा धमाका पाहायला मिळणार आहे. परिसरात चर्चेत असलेल्या ‘ओंकार’ हत्तीच्या नावाने कोनाळ मतदार संघातील खेळाडूंसाठी ‘Omkar धमाका’ क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आयोजित ही स्पर्धा दि. ४ आणि ५ एप्रिल २०२६ रोजी क्रीडा संकुल, घोडगेवाडी येथे रंगणार आहे.
एखाद्या जंगली प्राण्याप्रती आपुलकी दाखवत, त्याच्या नावाने क्रीडा स्पर्धा भरवण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच अनोखा उपक्रम असल्याने सध्या संपूर्ण परिसरात या स्पर्धेची जोरदार चर्चा सुरू आहे.
वनराईच्या सानिध्यात आणि उत्साहाच्या वातावरणात होणारी ही स्पर्धा खेळाडूंसाठी पर्वणी ठरणार आहे. आयोजकांनी खेळाडूंच्या सोयीसाठी जय्यत तयारी केली असून खालील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यात सहभागी खेळाडूंना आयोजकांकडून क्रिकेट ड्रेसेस दिले जातील.
भोजनाची सोय करण्यात आली आहे स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था असेल.
भव्य पारितोषिके व रोख रक्कमेसह आकर्षक चषकांची लयलूट होणार आहे.
यात विजेत्या संघांना रोख रकमेसह सन्मानित करण्यात येईल यामध्ये
प्रथम पारितोषिक: ₹ ३३,३३३/- व आकर्षक चषक
द्वितीय पारितोषिक: ₹ २२,२२२/- व आकर्षक चषक
“वन्यजीव आणि खेळाडू यांचे एक वेगळे नाते या स्पर्धेच्या माध्यमातून अधोरेखित होत आहे. कोनाळ मतदार संघातील खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नावनोंदणीसाठी त्वरित संपर्क साधा:
कोनाळ मतदार संघातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
अतुल कर्पे: ९८८१७११८३३
संतोष देसाई: ९४२०२०९१५१













