कणकवली : एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कणकवली येथील विद्यार्थ्यांसाठी Alphonsol Pvt. Ltd. कंपनी चा प्लेसमेंट ड्राईव्ह दि.२१-०२-२०२६ रोजी ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता. ही निवड प्रक्रिया कंपनीच्या परिसरात ऑफलाइन मुलाखतींच्या माध्यमातून झाली.
या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (Computer Engineering)आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकी (Artificial Intelligence and Machine Learning Engineering) विभागाच्या अंतिम वर्षातील एकूण ४० पात्र विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २०२४–२५ शैक्षणिक वर्षातील ओमकार सोनटक्के (Flutter Developer) व जीवन कांबळे (Developer) तसेच २०२५–२६ शैक्षणिक वर्षातील जान्हवी केळुसकर(Flutter Developer), तन्मया होडावडेकर(Developer), मोहिनी जाधव(Tester)आणि प्राची बांदेकर(Business Analyst) या सहा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली.
महाविद्यालयाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी अशा विविध नोकरीच्या संधी निर्माण करण्यास महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
निवड प्रक्रियेमध्ये ॲप्टिट्यूड व ग्रुप डिस्कशन या फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर आयटी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी लागणारी कौशल्य विकसित होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल असा विश्वास प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी व्यक्त केला.
एस. एस. पी. एम. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कणकवली सन 1999 पासून संस्थापक खासदार माननीय नारायणरावजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षा सौ. नीलम ताई राणे, उपाध्यक्ष आमदार डॉ. निलेश राणे, सचिव आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे.
सदर नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्षा सौ नीलम ताई राणे, उपाध्यक्ष आमदार डॉ. निलेश राणे, सचिव कॅबिनेट मंत्री श्री.नितेश राणे, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर, सर्व विभाग प्रमुख, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.











