भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

तर समीरा सुर्वे यांना जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी तालुकाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत मांडवकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जिल्हा चिटणीस पदी समीरा सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे .
वेरवली गावचे सुपुत्र असलेले चंद्रकांत मांडवकर यांनी भाजपाचे तालुका अध्यक्ष म्हणून यापूर्वी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणूनच भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी चंद्रकांत मांडवकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे
त्याचप्रमाणे तालुक्यातील कुरंग गावच्या असलेल्या समीरा सुर्वे यादेखील गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या देखील कामाची दखल घेत जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी समीरा सुर्वे यांच्यावर जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल चंद्रकांत मांडवकर आणि समीरा सुर्वे यांचे तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले व संपूर्ण तालुका कार्यकारणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे