मसुरे | प्रतिनिधी देवगड तालुक्यातील मुणगे कारिवणेवाडी येथील मूळ रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या सौ. प्रिती प्रकाश लब्दे (४७ वर्ष ) यांचे हृदयवीकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, बहिणी भावोजी,भाऊ, आई,नंनदा, पुतण्या,भाचे, भाच्या असा मोठा परिवार आहे. बारावा व तेरावा विधी उमेश नगर डोंबिवली येथील निवासस्थानी 11 मार्च रोजी होणार आहे. मुणगे व डोंबिवली येथील श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ डोंबिवली प. चे मालक प्रकाश लब्दे यांच्या त्या पत्नी होत. फोटो : प्रीती लब्दे











