पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टीच्या उपक्रम
भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची माहिती
कणकवली : लव्ह जिहाद व त्यातून होणाऱ्या धर्मांतराच्या गंभीर समस्येबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळा तसेच ज्युनिअर व सिनिअर कॉलेजमधील मुलींमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मुलींसाठी ‘केरळा स्टोरी 2’ या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. हा शो ७ मार्चपासून कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
हिंदू धर्मीय मुलींना फसव्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याच्या लव्ह जिहादच्या घटनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लव्ह जिहादचे बळी ठरलेल्या मुलींच्या आयुष्याची धर्मांतरानंतर कशी फरफट होते, हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. या माध्यमातून मुलींमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार भाजपा कणकवली तालुक्याच्या वतीने किशोरवयीन मुली, तसेच ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींसाठी हा चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शनिवार, ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील लक्ष्मी चित्रमंदिरमध्ये विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजताचा शो हाऊसफुल झाला असून त्यानंतरही मुलींना हा चित्रपट लक्ष्मी चित्रमंदिर येथे मोफत दाखविण्यात येणार आहे. ज्या मुलींना ‘केरळा स्टोरी 2’ हा चित्रपट मोफत पाहायचा आहे, त्यांनी भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री (मो. 9577654565), भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे (मो. 9422381900) किंवा नगरसेविका मेघा गांगण (मो. 9152120512) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













