मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र चेंबर (MACCIA) च्या १३ व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत उद्योग, व्यापार, MSME, कौशल्य विकास व ग्रामीण उद्योजकतेच्या बळकटीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र राज्याचे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मसुरे गावचे सुपुत्र युवा उद्योजक जयेश श्रीकृष्ण परब यांची सिव्हिल एव्हिएशन समितीच्या को -चेअरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. एव्हिएशन क्षेत्रातील संधी, लॉजिस्टिक्स व समन्वय वृद्धिंगत करण्याचे कार्य या समितीच्या माध्यमातून होईल असे उद्योजक जयेश परब यांनी सांगितले. उद्योजक जयेश परब हे स्वामी समर्थ एअर फ्राईटचे डायरेक्टर असून त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे. यावेळी सोनाली गुंजाळ, शेखर घोडके, सुजान सिंग कुमरे , दीपाली चांडक, गौरव सोमवंशी, संतोष राणे, मनोज भोसले, किरण भोसले, तेजस्वी राव, शामिका नाडकर्णी, अण्णासाहेब पाटील, विश्वजीत मोटे, रामेश्वर पवार आदींना विविध समिठी वर निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले.
सर्व समित्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार व ग्रामीण उद्योजकतेच्या सर्वांगीण व शाश्वत प्रगतीस निश्चितच सकारात्मक चालना मिळेल असे मान्यवरानी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष हेमंत राठी, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष संजय सोनवणे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, शंकर शिंदे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी, राज्य मुख्य समन्वयक वेदांशु पाटील, सेक्रेटरी जनरल सुरेश घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.











