रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाण्याचे मीटर चोरी करणाऱ्या एका आरोपीस अटक करून चोरीस गेलेले मीटर हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. मागील काही दिवसांत शहरात पाण्याचे मीटर चोरीच्या तक्रारी नोंद झाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला.
दि6 मार्च 2026 रोजी रात्री 11.45 वाजता साहील संजय जाधव (25, रा.फगर वठार, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने बी.एस.एन.एल. ऑफिस परिसरातील तीन पाण्याचे मीटर चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्याने चोरी केलेले 9 हजार रुपये किंमतीचे तीन मीटर पोलिसांकडे जमा केले. तसेच, आरोपीने यापूर्वी दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून आणखी चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनीष बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी व उपविभागीय पोलीस अधिकारी मनलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.












