शिरोडा येथे जागतिक महिलादिन पाककला, महिलांचे खेळ, गाणी अशा विविध कार्यक्रमांनी संपन्न..

पाककला स्पर्धेत श्रद्धा धुरी प्रथम

वेंगुर्ले | प्रतिनिधी : पूर्ण प्राथमिक शाळा खर्डेवाडी, शिरोडा येथे जागतिक महिला दिन पाककला, महिलांचे खेळ, गाणी असे विविध कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत उत्साहात संपन्न केले. यावेळी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत श्रद्धा धुरी हिने प्रथम क्रमांक तर स्निती शिरोडकर द्वितीय आणि दिक्षिता कोरगावकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर उत्तेजनार्थ म्हणून आर्या बर्डे आणि अमिता रेडकर हिला गौरविण्यात आले. बागायतवाडी येथील महिलांनी एकत्र येत हा महिला दिन कार्यक्रम दिमाखात साजरा केला.

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी पाककला स्पर्धा तसेच विविध विनोदी व मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. पाककला स्पर्धेत महिलांनी चिकन पासून विविध चविष्ट व आकर्षक पदार्थ सादर करून आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच आयोजित करण्यात आलेल्या खेळांमुळे उपस्थित महिलांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समीर चराटकर यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदनातून महिलांना विविध खेळांमध्ये खिळऊन ठेवत सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे आणि एकत्र येऊन आनंद साजरा करणे हा होता. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धांमधील विजेत्या महिलांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बागायतवाडी महिला, बागायतवाडी मित्रमंडळ, शाळेच्या शिक्षक सुनील घाग आणि अश्विनी पाटवेकर यांनी परिश्रम घेतले.