चिपळूण : शिवसेनेचे चिपळूण तालुका प्रमुख श्री संदेशबापू मनोहर आयरे यांची चिपळूण पंचायत समितीच्या उपसभापती पदी निवड झाली.
संदेशबापू आयरे गेली 20 वर्षे सातत्याने लोकांच्या संपर्कात असून त्यांनी स्वतःला जनसेवेसाठी अर्पण केले आहे. कोणताही पूर्वीचा राजकीय वारसा नसतानाही मोठी राजकीय उडी घेतली असून रात्री अपरात्री लोकांच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात. येणार्या कालावधीत शक्य तितक्या जास्त वेळ आपण जनतेच्या अखंड विकासासाठी देणार असल्याचे सांगितले. तसेच आपले आदर्श महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथभाई शिंदे यांना अभिमान वाटेल असे काम करून दाखवू अशी ग्वाही दिली आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले.











